गुरु ज्ञानAgrostar
पिकात मल्चिंग च्या वापराचे फायदे!
👉🏻 तणांच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण– पॉलिथिन मल्चिंग पेपरचा वापर केला तर भाजीपाला पिकामध्ये जी काही पिकासोबत स्पर्धा करणारी तणे असतात ते नियंत्रित राहतात.
👉🏻 मजुरांची बचत– मल्चिंगचा वापर केला तर तणाचे नियंत्रण होते व मजुरी वरचा खर्च बऱ्यापैकी वाचतो.
👉🏻कमीत कमी पाण्यामध्ये मिळते चांगले उत्पादन– पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व कमी पाण्यात सुद्धा पिकांचे भरघोस उत्पादन घेता येते.
👉🏻खतांची होते बचत– आपल्याला माहित आहे की रासायनिक खते उघड्या जमिनीत दिले तर त्यातील बराच खतांचा भाग वातावरणाशी संपर्क आल्याने नष्ट होतो. जमिनीत दिलेल्या खताचे अपेक्षित परिणाम पिकांवर दिसून येत नाही. जर मल्चिंग पेपर वापरला तर उपलब्ध अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो व पिकांना खतांची उपलब्धता वाढते.
👉🏻फळांच्या प्रतीत सुधारणा– पिकामध्ये आच्छादन वापरले तर भाज्यांचा मातीशी संपर्क न आल्याने भाज्यांची प्रत सुधारते तसेच फळांचा आकर्षकपणा टिकून राहून त्यांना भाव चांगला मिळतो.
👉🏻 रोग व किडींचा बंदोबस्त करता येतो– पिकामध्ये आच्छादन वापरले नाही तर मुळकुज, खोडकूज, पानावरील करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. काही किडींचे अवशेष गळून पडलेल्या फळ व पानांच्या माध्यमातून जमिनीत जातात व तिथे काही काळ सुप्त अवस्थेत राहून पुन्हा पिकावर प्रादुर्भाव करतात. मल्चिंग पेपरचा वापर केल्यास रोग व किडींच्या जमिनीतील वाढीस अटकाव तयार होतो व उत्पादनात वाढ होते.
👉🏻 मातीचा घट्टपणा कमी होतो– पॉलिथिन वापरामुळे माती मोकळी, भुसभुशीत राहते. त्यामुळे पिकाच्या मुळांभोवती हवा खेळती राहते व उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणावर होते.
👉🏻लवकर उत्पादन मिळते– पॉलिथिन मल्चिंगमुळे पिकांमध्ये 15 ते 21 दिवस अगोदर भाज्यांची व फळांची वाढ होते. त्यामुळे भाजी व फळे लवकर परिपक्व होतात.
👉🏻संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.