गुरु ज्ञानAgrostar
पिकातील पिवळा मोझाईक व्हायरस नियंत्रण!
🌱सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव येत आहे. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार व वहन पांढरी माशी या किडीमुळे होते तसेच अनुकूल वातावरण, दाट पेरणी,नत्रयुक्त खताचा अतिवापर या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत आहे.
🌱प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या पानांचा काही भाग हिरवा, तर काही भाग पिवळसर होतो. पानामधील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकार लहान होतो आणि रोगग्रस्त झाडाला दाणे भरत नाहीत. प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे शक्य नाही त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
🌱प्लॉट मध्ये जर प्रादुर्भाव दिसत असेल तर प्रादुर्भाव ग्रस्थ झाडे काढून टाकावीत. रोगाचा प्रसार वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. पांढरी माशी तसेच अन्य रसशोषक किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
🌱संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा