गुरु ज्ञानAgrostar
पिकातील गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रण
🐌या किडीशी सर्वच जण परिचित आहेत पण यामुळे होणारे नुकसान व त्यावर उपाययोजना जाणून घेऊ या.
गोगलगाय🐌 ही एक बहुभक्षी किड आहे. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे आधाशासारखे खाऊन नुकसान करते.
या किडीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आद्रता तसेच कमी तापमान (20 - 32 अंश सेल्सिअस) पोषक
आहे. शंखी (स्नेल) तसेच शेंबडी (स्लग) हे प्राणी मालुस्का या वर्गात समाविष्ट केलेली आहे. शंखीच्या अंगावर
टणक कवच असते तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते. गोगलगाय सरपटत चालते व चालताना सतत चिकट
स्ञाव सोडते, त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते. शेतात हा स्ञाव वाळल्यावर त्या जागेवर पांढरा
चकाकणारा पट्टा दिसतो, त्यावरून आपण या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखू शकतो. ही किड
राञीच्या वेळी सक्रिय राहुन पिकाचे नुकसान करते.
👇उपाययोजना :
प्रभावी नियंञणासाठी मेटाअल्डीहाइड 2.5 टक्के घटक असणारे स्नेलकिल या कीटकनाशकाच्या वड्या तुकडे करून 4 किलो प्रति एकर याप्रमाणे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात
गोगलगाय रेंगाळण्याच्या जागेवर, झाडांच्या बुडाजवळ, तसेच दोन ओळींच्या मध्ये ठेवाव्यात.
संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.