AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकाच्या आधारभूत किंमती वाढणार!
कृषी वार्ताAgrostar
पिकाच्या आधारभूत किंमती वाढणार!
➡️एमएसपी म्हणजे काय? एमएसपी (MSP) म्हणजे किमान हमी भाव किंवा किमान आधारभूत किंमत. या किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकांची खरेदी करतं. एकदा का एखाद्या पिकाला किमान हमी भाव जाहीर केला तर त्या किमतीखाली त्या पिकाची खरेदी करता येत नाही. किमान तेवढ्या किमतीला संबंधित पीक खरेदी करणं सरकारला बंधनकारक असतं. किमान हमीभावामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचं आश्वासन मिळतं, दिलासा मिळतो. ➡️केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरुन 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1635 वरुन 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेटने मान्यता दिली आहे. ➡️गहू, हरभऱ्याप्रमाणेच इतर महत्वाच्या सहा रबी पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मसूरचा एमएसपी सर्वाधिक 500 रुपये वाढून 6 हजार रुपये क्विंटल झाली आहे. तर मोहरीचा एमएसपी 400 रुपयांनी वाढवला आहे. करडईचा एमएसपी 5 हजार 441 होता. तो 209 रुपयांनी वाढून 5 हजार 650 रुपये क्विंटल झाली आहे. ➡️खरीप आणि रबी पिकाचा एमएसपी वर्षातून दोनदा ठरवला जातो, कृषी खर्च आणि किमती आयोग म्हणजे सीएसीपी या संबंधित केंद्र सरकारकडे शिफारस करतो. त्या आधारे दरवर्षी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि आणि इतर पिकांचा एमएसपी घोषित केला जातो. या शिफारशी लक्षात घेऊन सरकार एमएसपी जाहीर करते. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख