AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया!
समाचारTV9 Marathi
पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया!
➡️ मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपातील सर्व पिके ही पाण्यात आहेत. नुकसान भरपाईच्या अनुशंगाने गावागावात वेगवेगळी चर्चाही असते. ती म्हणजे नेमका पिकांचा पंचनामा म्हणजे काय? आणि कोणती प्रक्रिया केल्यानंतर आपण नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात हे कायम असतात. पंचनामा प्रक्रिया नेमकी कशी असते हे जाणून घेऊया. 1) जास्तीचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग तसेच महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातात 2) पिकाची पेरणी झाली की, त्या पिकाची विमा रक्कम अदा करणे आवश्यक आहे. पिकानिहाय ही रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेली असते. 3) पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या संबंधिची माहिती ही कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांना देणे आवश्यक आहे. यानंतर पिक पाहणीसाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. आता मात्र, सरसकट नुकसान झाल्याने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 4) या दरम्यान शेतकऱ्याजवळ सातबारा उतारा, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. 5) पिक पेऱ्याचे क्षेत्र, बाधित क्षेत्र तसेच तुलनेने किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल या कर्मचाऱ्यांकडून तयार केला जातो. 6) पिक पंचनाम्याचा अहवाल हा महसूल विभागाकडे पाठविला जातो. 7) महसूल विभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल हा संबंधित कंपनीकडे पाठविला जातो. मात्र, नुकसान भरपाईसाठी लागवडीच्या क्षेत्रापैकी किमान 25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक आहे. 8) नुकसान अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या बॅंक पासबुकच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम वर्ग केली जाते. ➡️ ऑनलाईनद्वारे नुकसानीची माहिती भरण्याचे अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
4