AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकांसाठी वापरले जाणारे एकात्मिक खत व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकांसाठी वापरले जाणारे एकात्मिक खत व्यवस्थापन
• कुठल्याही पिकामध्ये जास्तीत जास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. • कोणत्याही पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शिफारशी नुसार पिकास लागणारे एकूण अन्नद्रव्यांची खतमात्रा देणे आवश्यक आहे. परंतु बहुतेक वेळी ह्याची माहिती नसल्यामुळे संतुलित खतांचा वापर जमिनीत केला जात नाही यामुळे आपल्याला पिकात वेगवेगळ्या अन्नद्रव्याची कमतरता किंवा अन्नद्रव्य जास्त प्रमाणात झालेली दिसून येणे व पीक कीड रोग यांना जास्त बळी पडणे अशी लक्षणे झाडावर दिसून येतात. • तसेच जमीन क्षारपाट किंवा आम्लयुक्त होणे, जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब प्रमाण बिघडणे अश्या समस्या येतात. पर्यायाने जमिनीचा ऱ्हास होतो आणि आपल्याला पाहिजे तसे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत नाही. • यावर उपाययोजना म्हणून शक्य झाल्यास पीक लागवडीपूर्वी माती परीक्षण करावे. • जमिनीची योग्य मशागत करून जमिनीत चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर जास्तीतजास्त करावा. • शक्य झाल्यास मुख्य पीक लागवडीपूर्वी अथवा मुख्य पिकात आंतरपीक म्हणून जमिनीत हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत फुलोरा अवस्थेत गाडून दयावे. • सुरुवातीला पिकास पाहिली खतमात्रा देताना माती परीक्षण करून शिफारसी नुसार सिंगल सुपर फॉस्फेट, डीएपी, एमओपी, एसओपी यासारख्या खतांचा वापर करावा जेणेकरून पीक वाढीच्या अवस्थेत त्याची उपलब्धता होऊन पिकास त्याचा फायदा होईल. • पीक वाढीच्या अवस्थेतेनुसार म्हणजे दुसरी आणि पुढील खतमात्रा देताना आधी पिकात असणारे तन व्यवस्थापन करून अमोनिअम सल्फेट २४:२४:००, १९:१९:१९, युरिया आणि इतर विद्राव्ये खते यांसारखे पिकास लगेच उपलब्ध होणाऱ्या खतांची मात्रा देऊन जमिनीत हलकी मशागत करून घ्यावी व पिकास लगेच पाणी द्यावे. जेणेकरून पिकास अन्नद्रव्ये लगेच लागू होतील आणि अन्नद्रव्याचा ऱ्हास न होता जमिनीची गुणवत्ता टिकवून राहील. • तसेच पिकात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सल्फर हे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर देखील सुरुवातीपासून करावा. जेणेकरून पिकात त्याची कमतरता भासणार नाही. • ऍझोटोबॅक्टर, पीएसबी, रायझोबियम ऍसिटोबॅक्टर यांसारख्या जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया करताना अथवा उभ्या पिकात करावा. परंतु जैविक खतांचा वापर करताना इतर रासायनिक घटकांसोबत त्याचा वापर करणे टाळावे. • जैविक आणि सेंद्रिय खतांमुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जीवांची हालचाल वाढून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे जमिनीत पाणी, धरून ठेवाण्याची क्षमता, खेळती हवा व पिकाची उत्पादकता वाढेल. त्यामुळे पिकात सेंद्रीय, जैविक आणि रासायनिक ह्या सगळ्या घटकांचा संतुलित समावेश केला पाहिजे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
483
8