गुरु ज्ञानAgroStar
पिकांमधील गंधक वापराचे फायदे!
🌱गंधक किंवा सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहे. याच्या वापरामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळून उत्पादन वाढीसाठी याचा उपयोग होतो. गंधक अन्नद्रव्याची कमतरता असेल तर पिकाची पाने पिवळी पडतात तसेच फळांची योग्य वाढ होत नाही. या अन्नद्रव्याच्या वापरामुळे सोयाबीन, भुईमूग सारख्या पिकात तेलाचे प्रमाण वाढते. कांदा, मिरची यांसारख्या पिकात तिखटपणा वाढतो. लसूण, आले, हळद पिकांमध्ये सुगंधीपणा वाढतो. कापूस पिकामध्ये धाग्याची गुणवत्ता वाढते. ऊस, पपई यांसारख्या पिकात गोडवा वाढतो. यासोबत जास्त पाऊस झालेल्या जमिनीमध्ये लवकर वाफसा येण्यासाठी देखील गंधकाचा महत्वाचा वाटा आहे.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.