AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकांना बसतोय पावसाचा फटका, शेतात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल!
सल्लागार लेखवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
पिकांना बसतोय पावसाचा फटका, शेतात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल!
➡️ परतीच्या पावसाने मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असून विविध जिल्ह्यांमध्ये खरीपाच्या पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. तसेच पुढील 12 ते 18 सप्टेंबर या पाच दिवसातही मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांसाठी योग्य सल्ला दिला आहे. कापूस, तूर, मूग/उडीदाची काय स्थिती? ➡️ तज्ञांच्या सल्ल्यानुसार, कापूस सध्या पाते लागणे ते बोंड धरण्याच्या स्थितीत आहे. मागील आठवड्यातील पावसामुले कापूस पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याने फवारणीची कामे पुढे ढकलावीत. ➡️ तूरीला फांद्या फुटण्याचे दिवस असल्याने तुरीतीलही अतिरिक्त पाणी काढून द्यावे. फवारणी आताच करु नये. मूग व उडीदाचे पिक सध्या काढणीच्या स्थितीत असल्याने पिकाची काढणी सुरक्षित ठिकाणीच साठवावी. ती पावसात भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. भुईमूग, मका सध्या कोणत्या अवस्थेत? ➡️ भुईमूग सध्या फुलधारणा अवस्थेत आहे. त्यामुळे पिकात पाणी साठले असेल तर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच मक्याचीही सध्याची वाढीची स्थिती असल्याने अतिरिक्त पाणी साठू देऊ नये. ➡️ तसेच केळी, आंबा, द्राक्ष, सिताफळ आदी फळांमध्ये सध्या वाढीचा काळ असल्यामुळे फळबागेतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. काढणीस तयार असलेल्या भाज्या काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागातील मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे. पशुधनाची काळजी कशी घ्याल? ➡️ गेल्या काही दिवसांपासून दमट हवामान व सततच्या पावसामुळे पशुधनाला आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यत असते. पावसात जनावरांचे गोठे कोरडे राहतील, अशी काळजी घ्यावी. जनावरांना कोरड्या जागी बांधावे, पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांना सर्दी, निमोनिया यासारख्या आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरीत पशूवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना तज्ञांनी दिल्या आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
4