AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकांना पाणी देण्यासाठी 10 एचपी सोलर वॉटर पंप एक चांगला पर्याय!
सल्लागार लेखकृषी जागरण
पिकांना पाणी देण्यासाठी 10 एचपी सोलर वॉटर पंप एक चांगला पर्याय!
येणाऱ्या काळामध्ये सोलर वाटर पंपाचा वापर वाढेल. तसेच मार्केटमध्ये सोलर वॉटर पंप तयार करणाऱ्या कंपनी आहे काही दिवसात मोठ्या प्रमाणात उतरतील. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे डिझेलच्या वाढत्या किमती तसेच विजेच्या सततचा लपंडाव या समस्यांमुळे शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून सोलार वॉटर पंप फायद्याचे ठरतील. 1 ते 100 एचपी चे पंप- ➡️ शेती क्षेत्रातील अग्रगण्य असलेली किर्लोस्कर कंपनी सोलर पॅनल चा वॉटर पंप बनवीत आहे. या सगळ्यां सिस्टीम मध्ये एक सोलर पॅनल असतो. ज्यावर सूर्याचे प्रकाश पडल्याने हे ऊर्जा डी सी मध्ये परावर्तित होते. या डी सि ला कंट्रोलच्या सहाय्याने एसी मध्ये परावर्तित केले जाते त्यामुळे वॉटर पंप चालवणे सुलभ होते. किर्लोस्कर कंपनीने एक एचपी पासून ते 100 एचपी पर्यंत कृषी पंप बनवण्याचे लक्ष ठेवले आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की, आपल्या बोरवेल च्या मर्यादेनुसार सोलार वॉटर पंप निवडावा तसेच या पंपाच्या साहाय्याने किती अंतरापर्यंत पाणी घ्यायचे आहे याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. सोलर वॉटर पंपची किंमत ➡️ कंपनीकडून सोलर पॅनल सहित वाटर मोटर चा सगळा संच दिला जातो. यासाठी किरलोस्कर कंपनीचा 1 एचपी च्या पंपाची किंमत दीड लाख रुपये पर्यंत आहे. यामध्ये सोलर पॅनल, मोटर, पंप आणि इंस्टॉलेशन हा सगळा खर्च समाविष्ट आहे. तसेच 3 एचपी पंपाची किंमत अडीच लाख रुपये आहे, तसेच 2 एचपी च्या पंपाची किंमत एक लाख 80 हजार रुपये आहे. 10 एचपी पंपाची किंमत सहा लाख रुपये आहे. सरकारी अनुदान ➡️ शेतकऱ्यांसाठी या किमती फार जास्त आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणूनसरकारकडून सबसिडी दिली जाते. अगोदर शेतकऱ्यांना सोलर मोटर वर सबसिडी मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. परंतु यामध्ये ज्या संख्येत शेतकरी रजिस्ट्रेशन करतात त्या सगळ्यांना सबसिडी मिळत नाही. यामध्ये लकी ड्रॉ काढून सबसिडी वाटली जाते. दहा तास चालते ही मोटर ➡️ एक सोलर वॉटर पंप दिवसभरात सहा ते दहा तास चालतो. जर प्रखर उष्णता असेल तर हा कालावधी वाढवू शकतो. जर डिझेलचा आणि विजेचा हिशोबाने पाहिले तर सोलर पंप एकदम स्वस्त साधन आहे. जर अनुदानावर सोलर वॉटर पंप मिळाला तर मोटारीसाठी पाच वर्षाची आणि सोलर पॅनल साठी 25 वर्षाची वारंटी मिळते. जर विनाअनुदानित सोलर वॉटर पंप मिळाला तर मोटारीसाठी दीड वर्ष आणि सोलर पॅनल साठी पंधरा वर्षाची वारंटी मिळते. सोलर मोटर ची वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये एक स्विचप्लग असतो त्याच्या साह्याने तुम्ही विजेवर देखील हा पंप चालू शकतात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी जागरण हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
22
इतर लेख