कृषि वार्ताAgroStar India
पिकं वाहून गेली? – पावसाच्या नुकसानीनंतरचं नियोजन
👉अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा वेळी योग्य उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे यांनी शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.👉शेतात साचलेलं पाणी तात्काळ काढून टाका. मुळांद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट वापरा. मर आणि मुळकूज रोगांवर नियंत्रणासाठी योग्य बुरशीनाशक फवारणी करा. तसेच 19:19:19, अमिनो अॅसिड, समुद्री शेवाळ अर्क आणि सिलिकॉन वापरून पोषण व्यवस्थापन करा.👉तूर, ऊस आणि कपाशी सारख्या उभ्या पिकांना आधार द्या आणि रब्बी हंगामासाठी भांडवल टिकवून ठेवा. ठिबकद्वारे सल्फर आणि इतर पोषक द्रव्यांचा वापर केल्यास पिकांना पुन्हा तजेला येतो.👉 संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.