AgroStar
पाहा, शेतकऱ्यांसाठी निवृत्तीवेतन योजनेचे उद्दिष्ट
कृषि वार्तासकाळ
पाहा, शेतकऱ्यांसाठी निवृत्तीवेतन योजनेचे उद्दिष्ट
नवी दिल्ली- सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, दरम्यान, १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना साठाव्या वर्षी मासिक ३००० रूपये निवृत्तीवेतन देऊ करणाऱ्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात पाच कोटी शेतकऱ्यांना लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरविले आहे. यामध्ये वयोगट निहाय हप्त्याची रक्कम ठरविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांइतकीच रक्कम सरकारतर्फे दिली जाईल. यामध्ये लाभार्थ्याचे निधन झाल्यास पत्नी वारसदार असेल आणि वारसदाराला निम्मे निव-त्तीवेतन मिळेल. यासाठी दहा हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असून, ग्रामीण क्षेत्रातील जनतेची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा वाढेल, असा सरकारचा दावा आहे. संदर्भ – सकाळ, १ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
176
0
इतर लेख