क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताNavbharat Times
पाहा, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) साठी आवश्यक कागदपत्रे
शेतीशी संबंधित असलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो स्वत:च्या शेतीत शेती करत असला किंवा दुसऱ्यांची शेती करत असला, तरी तो केसीसी बनवू शकतो. किसान कार्डसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे कर्ज कालावधी संपेपर्यंत किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे असणे आवश्यक आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला अर्जदाराला सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात. परंतु काही प्राथमिक कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश आहे. याशिवाय अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटोदेखील असणे आवश्यक आहे. भाग २ मध्ये आपल्याला कळेल की शेतकरी केसीसीसाठी अर्ज कशाप्रकारे करू शकतात आणि कार्ड तयार होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागेल? संदर्भ : नवभारत टाईम्स संपूर्ण माहितीसाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर अपडेट राहा.
1250
0
संबंधित लेख