AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पावसाळ्यात पिकावर फवारणी करताना चिकट द्रव्य (स्टिकर) चा वापर करणे आवश्यक!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पावसाळ्यात पिकावर फवारणी करताना चिकट द्रव्य (स्टिकर) चा वापर करणे आवश्यक!
शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये फवारणी केल्यावर कमीत कमी ६ तासांपर्यंत पाऊस नसावा; अन्यथा पानावरील/झाडावरील कीटकनाशक धुऊन जाऊन फवारणी निष्प्रभ होते. फवारणीच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता असल्यास व फवारणी करणे आवश्यक असल्यास फवारणीच्या द्रावणामध्ये चिकट द्रव्य (स्टिकर) वापरले जावे. यासाठी उच्च दर्जाचे चिकट द्रव्य (स्टिकर/ स्प्रेडर) वापरल्यास ते औषध पानांच्या पृष्ठभागावर अत्यंत जलद पसरण्याची, चिकटून राहण्याची आणि पानांमध्ये वेगाने झिरपण्याची क्षमता वाढविते. बुरशीनाशक, कीटकनाशक, जिवाणूनाशक, तणनाशक यांच्यासोबत वापरल्याने कीटकनाशकांची क्रियाशीलता अधिक वाढत असल्याचे निष्कर्षातून सिद्ध झाले. त्यामुळे कीटकनाशक पानावर/झाडावर जास्त वेळ चिकटून राहून हलका पाऊस आल्यास धुऊन जात नाही. यामुळे पिकांवर औषधांचा परिणाम तर दिसून येतोच त्याचबरोबर खर्च देखील कमी होतो.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
118
23
इतर लेख