AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पावसाळ्यात ट्रॅक्टरच्या 'या' गोष्टींकडे नका करू दुर्लक्ष..
कृषी यांत्रिकीकरणकृषि जागरण
पावसाळ्यात ट्रॅक्टरच्या 'या' गोष्टींकडे नका करू दुर्लक्ष..
👉 सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात रस्ते खराब होत असतात. शेताकडील कच्च्या रस्त्यांची स्थिती सांगायला नको. अशा रस्त्यातून पायी चालणेही अवघड होऊन जात असते. वाहनेही चालविण्यास मोठी समस्या होत असते. या दिवसात आपण बऱ्याचवेळा ट्रॅक्टर पटल्याची, ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची बातमी वाचत असतो, ऐकत असतो. अशा घटना होऊ नयेत यासाठी आपण आपल्या वाहनांची काळजी घेतली पाहिजे. शेती व्यवसायामध्ये ट्रॅक्टर हे महत्त्वाची साधन झाले आहे. तर शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरविषयी खाली काही गोष्टी होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित आपल्या ट्रॅक्टरची दुरुस्ती करावी. 👉 बऱ्याच वेळेस आपण आपले वाहन नेहमी सर्व्हिस करत असतो, पण टायरकडे लक्ष देत नसतो. पूर्ण टायर खराब होईपर्यंत आपण वाहनांची किंवा ट्रॅक्टरची टायर बदलत नसतो. यामुळे दुर्घटना होत असते, याची काळजी घ्या. आजच्या या लेखा आपण याचविषयी माहिती घेणार आहोत. टायरचे आयुष्य म्हणा किंवा टायर टिकण्याची क्षमता ही चालकावर अवंलबून असते. यात चालकाची वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती, गती, वजन, दाब आदी. जर आपल्या वाहनांचे टायर खराब झाले असतील तर काही सोप्या पद्धतीने किंवा संकेतावरुन आपल्याला याची कल्पना येऊ शकते. 👉 ब्रेक लावल्यानंतर जर ट्रॅक्टर स्लीप करत असेल म्हणजेच सरकत असेल तर आपल्या ट्रॅक्टरच्या टायरमध्ये काहीतरी खराबी आली आहे. टायरच्या वरील स्थर हा नाहीसा झाला असले तर सावधनगिरी बाळगावी. जर वाहनांच्या टायरांना पाच वर्ष पुर्ण झाले असतील तर ६ महिन्यांमध्ये त्यांची तपासणी करावी. खराब आणि खडकाळ रस्त्यांवर जास्त चालवण्याने टायर्सचे आयुष्य कमी होत असते. जर टायरमध्ये फुगवटा आला असेल तर त्याला बदलण्याचा वेळ आला आहे. जर बाजूच्या भागामध्ये तडे पडत असतील तर टायर कमकुवत झाल्याचे समजावे. संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
6
इतर लेख