AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन!
पशुपालनAgrostar
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन!
➡️पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जनावरांमध्ये संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. हे टाळण्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन करावे. १) गळणाऱ्या गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या प्रजनन व कार्यक्षमतेवर परिणाम होतो. गोठ्यात जर पावसाची झडप येत असेल किंवा छतामधून गोठ्यामध्ये पाणी येत असेल तर जनावर बैचेन होते. पाणी, शेण आणि जनावराचे मलमूत्र यामुळे अमोनियाचे प्रमाण वाढते. विषारी वायूची निर्मिती होऊन जनावरांच्या डोळ्यावर सूज येते, शरीराची आग होऊन खाज सुटते. यामुळे जनावर स्वस्थ राहत नाही. शेळ्या ओलसर जागी बसत नाहीत शेळ्यामध्ये तणाव दिसून येतो. २) पावसाळ्यामध्ये गवताची उगवण क्षमता तसेच वाढ अधिक प्रमाणात असते. या चाऱ्याकडे जनावरे आकर्षित होतात. जनावरांना पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते. परंतु हे जनावरांसाठी अपायकारकसुद्धा आहे. पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात व कोरडा चारा कमी खातात. पावसाळ्यात उगवणाऱ्या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते व तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते, जनावरांना हगवण लागते. ३)जनावरांचे खाद्य जर भिजले तर खाद्यामध्ये बुरशी निर्माण होते, त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. ४)अस्वच्छ गोठ्यात कासेचे आजार बळावतात. दुधाचे उत्पादन कमी होते. ५)पावसाळी वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने विविध प्रकारच्या जिवाणू तसेच विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते. यामुळे जनावरे जिवाणूजन्य व विषाणूजन्य आजारास बळी पडतात. कृमींना सुद्धा पावसाळ्यातील वातावरण पोषक ठरते. परिणामी, जनावरे वेगवेगळ्या कृमींना बळी पडतात. माशांचे प्रमाण वाढते, माशा जनावरांना चावतात जनावर बैचेन होते. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो. ६) खुरांमध्ये चिखल राहिल्यामुळे खुरामध्ये जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन खुरांचे आजार दिसून येतात. काही वेळेस जनावर लंगडते. ➡️उपाययोजनाः १) गोठ्याची स्वच्छता करून आतील भिंती आणि गोठ्याचा परिसर चुन्याने रंगवून घ्यावा. २) गोठा कोरडा ठेवावा. गोठ्याचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. जेणेकरून भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश आत येऊ शकेल. ३) गोठ्याच्या स्वच्छतेसाठी दिवसातून एकदा जंतुनाशक फवारावे. ४) गोठ्यामध्ये माशा आणि डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सीताफळ किंवा पेरूच्या पानाची धुरी करावी. ➡️संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
0
इतर लेख