सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पावसाचे पाणी साठवणुकीचे नियोजन!
पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे.पावसाचे पाणी घराच्या,इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात व वर्षभर पिण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी शेती, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी योग्य असते. अश्या प्रकारे दीर्घ मुदतीसाठी पाणी साठवण करून वापरू शकतो. पावसाचे पाणी साठविताना घ्यावयाची काळजी: १. छपराच्या उताराचा आणि कुटुंबाच्या गरजेचा नीट अभ्यास करून टाकीचे आकारमान ठरवावे. २. पाऊस पडण्यापूर्वी छप्पर स्वच्छ करावे. किंवा सुरुवातीला एखादा तास पाऊस पडून गेल्यानंतर पाणी टाकीत सोडावे. ३. टाकीत पाणी सोडण्यापूर्वी फिल्टर टँकचा उपयोग केल्यास पाणी अधिक शुद्ध होते. ४. टाकी सिमेंट किंवा आरसीसीमध्ये बांधावी. टाकी जमिनीखाली बांधल्यास जागेची बचत होते आणि पाणी सुरक्षित राहते. तसेच टाकी सर्व बाजूंनी बंदिस्त असावी. फायदे - • योग्य प्रकारे जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. • जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. • जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते • जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. • जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते. • गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. • जलसंधारणाच्या बऱ्याच पद्धती या घरबांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. • समुद्री प्रदेशाजवळील भागांमध्ये, जमिनीखालील खाऱ्या व क्षारयुक्त पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंधारण महत्त्वाचे काम करते. • निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
संबंधित लेख