AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पावसाचा खंड पडल्यास खालील उपाययोजना कराव्यात
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पावसाचा खंड पडल्यास खालील उपाययोजना कराव्यात
1. पिक वाढीच्या अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करून ठेवावी. शक्यतो पाणी वाऱ्याचा वेग कमी असताना द्यावे. पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. 2. पाण्याची उपलब्धता असल्यास ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.शेततळे ,विहीर, किंवा कुपनलिका यांचे पाणी कार्यक्षमपणे पाणी वापरावे. 3. पिकांची अवस्था लक्षात घेऊन हलक्या कोळपण्या कराव्यात तसेच पिकांना मातीची भर द्यावी.तणांचे व्यवस्थापन वेळीच करावे. 4. पिकांच्या दोन ओळींमध्ये आच्छादनाचा वापर करावा. 5. कीड व रोग व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करावे. सेंद्रिय व जिवाणू खताचा वापर केल्यास पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
6. फळबागेत रोगग्रस्त फांद्या काढून टाकून बोर्डोमिश्रणची १ टक्का फवारणी करावी.व तणांचे व्यवस्थापन करावे.तसेच फळबागेत आच्छादनाचा वापर करावा. 7. बाष्पीभवन कमी करण्यासाठी उसामध्ये एकरी २ ते ३ टन पाचाटाचे आच्छादन करावे.पाचट कुजवण्यासाठी प्रतीटन पाचटासाठी ८ किलो युरिया १० किलो सुपर फॉस्फेट, १ किलो पाचट कुजावणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा. 8. बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलिन ७ टक्के या प्रमाणे पानांवर फवारणी करावी. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
64
0
इतर लेख