AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पांढऱ्या माशीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- पांढरी माशी विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान करते. पिले आणि प्रौढ पिकातून रसशोषण करतात. हे विषाणूजन्य रोगाचे वाहक आहेत. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ५०% पर्यंत नुकसान होते._x000D_ जीवन चक्र_x000D_ अंडी:- मादी कीड पिकामध्ये खालच्या पानांच्या मागील पृष्ठभागावर मध्यम शिरालगत रांगेत अंडी देतात. मादी कीड पूर्ण जीवन कालावधीत ५१-१०० अंडी देतात. अंडी ७ ते १४ दिवसांत उबवतात._x000D_ पिले:- पिले पानांचा रसशोषूण पिकाचे नुकसान करतात. पिले त्यांच्या स्थितीत ३ वेळा त्वचा सोडतात._x000D_ कोषावस्था: - पिले पूर्ण विकसित झाल्यानंतर ते हिवाळ्यातील ३१ दिवसात आणि उन्हाळ्यात ११ दिवसांत कोषावस्थेत बदलतात. कोषावस्था ७ दिवसांची असते._x000D_ प्रौढ/पतंग:- पतंग कोषावस्थेपासून काही काळानंतर तयार होतात आणि मादी दोन दिवसांनी अंडी घालण्यास सुरवात करते. या पतंगाचा कालावधी ३० दिवसांचा असतो. वर्षभरात बर्याच पिढ्या होतात._x000D_ नियंत्रण:- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी @६६० मिली:७५० लिटर पाण्यात किंवा डायनोटेफ्युरॉन २०% एसजी @१२५-१५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ टीप:- औषधांचे प्रमाण वेगवेगळ्या पिकांनुसार बदलते._x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
108
0