AgroStar
पहा, CNG ट्रॅक्टरचे फायदे!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, CNG ट्रॅक्टरचे फायदे!
सध्या पेट्रोल आणि डिझेलवर ट्रॅक्टर चालवून शेती करणे सुद्धा खूपच अवघड झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल चे भाव आभाळपर्यंत गेले आहेत. त्यामुळं डिझेल वर ट्रॅक्टर चालवणे खूपच अवघड होऊन बसले आहे. आता मार्केटमध्ये अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहेत. आता बरीच वाहने इलेक्ट्रिक आणि गॅस वर तयार होऊ लागली आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये आता नवीन CNG वर चालणार ट्रॅक्टर आला आहे. CNG ट्रॅक्टरचा उपयोग केल्यानंतर प्रति वार्षिक शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा होईल अशी आशा आहे. • सीएनजी (CNG) बसविलेल्या ट्रॅक्टरचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हि मदत होईल. • डिझेलच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेजही जास्त असेल. • त्याची देखभाल खर्च इंधनयुक्त ट्रॅक्टरपेक्षा कमी असेल. यामुळे पैशाची बचत होईल. • सीएनएजी फिट केलेले ट्रॅक्टर प्रदूषणमुक्त असतात. यामुळे इंजिन बराच काळ काम करते. • सीएनजी डिझेल व इतर इंधनापेक्षा स्वस्त आहे. सध्या पेट्रोलच्या किमतीत किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आपण पाहतच आहोत त्यातुलनेत सीएनजी डिझेल स्वस्त आहे. • पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा सीएनजी इंजिनचे आयुष्य जास्त असते. • सीएनजी टाक्या अगदी घट्ट सील केल्या असतात त्यामुळे रिफाईलिंग दरम्यान स्फोट होण्याची व्याप्ती खूपच कमी आहे. • प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सीएनजी देखील फायदेशीर आहे. कारण यामुळे कार्बन उत्सर्जन 70% कमी होते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
2
इतर लेख