AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानशाश्वत शेती
पहा, हरभरा पिकामध्ये पाण्याचं नियोजन कसे करावे.
• जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. • मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. • भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात त्याकरिता ३०-३५ दिवसांनी पहिले व ६०-६५ दिवसांनी दुसरे पाणी दयावे. • हरभरा पिकाच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- शाश्वत शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
10