कृषि वार्ताडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
पहा साप्ताहिक हवमान अंदाज (२६ जुलै- ३० जुलै)!
👉 महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून उत्तर भागात १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००४ राहण्यामुळे इतका अधिक हवेचा दाब सुरवातीस राहण्यामुळे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होणे शक्य असून २८जुलै बुधवार रोजी पुन्हा हवेचे दाब कमी होण्यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल.
👉 तसेच त्यानंतर ३० जुलै शुक्रवार रोजी पुन्हा हवेच्या दाबात वाढ होताच पावसाचे प्रमाण कमी होणे शक्य आहे व शनिवारी हवेचा दाब कमी होईल.त्यामुळे कोकणात मुसळधार तसेच आज कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज असून उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणे शक्य आहे.
👉 हवामान अंशतः ढगाळ राहील .वाऱ्याची दिशा संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्येकडे राहील.मात्र मान्सून पावसाला जोर राहणार नाही .महाराष्ट्रावर सुरवातीच्या काळात ढगांचे आवरण पातळच राहील.
👉 मात्र त्यात बुधवार नंतर फरक पडेल.व ढंगाचे आवरण दाट राहणे शक्य आहे.त्यामुळेच महाराष्ट्रातील काही भागात म्हणजेच मध्यमहाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागात वाढणे शक्य होईल.
👉 एकूणच हा आठवडा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा आठवडा राहील. कोकण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार दि २५जुलै रोजी ५५मी मी पावसाची शक्यता असून रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ७० ते ७४ मी मी पावसाची शक्यता आहे.
👉 तसेच रायगड जिल्ह्यात ८१ मी मी पावसाची शक्यता आहे. तर सोमवार २६ जुलै रोजी रायगड व ठाणे जिल्ह्यात ७० मी मी तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३२ ते ५० मी मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडे राहील.
👉 उत्तर महारष्ट्र - नाशिक जिल्ह्यात रविवारी व सोमवारी दमदार पावसाची शक्यता असून पावसाचे प्रमाण पश्चिम भागात ४३ ते ४७ मी मी राहील उर्वरित धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात हेच प्रमाण ४-१६ मी मी इतके कमी राहणे शक्य आहे .
👉 मराठवाडा - मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यात या आठवड्यात रविवार व सोमवारी पावसाचे प्रमाण कमी राहणे शक्य आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ६मी मी लातूर ,परभणी औरंगाबाद, बीड, या जिल्ह्यात ४ते ६ मी मी तर नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ९१० मी मी पावसाची शक्यता असल्याने बराच काळ पावसात उघडीप आणि अल्पकाळ पाऊस अशी स्थिती राहील.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ - डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ)
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.