पहा राज्याचा हवामान अंदाज!
हवामान अपडेट डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
पहा राज्याचा हवामान अंदाज!
➡️महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील दाब वाढण्यास सुरवात झाली असून सध्या महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल असलेल्या हवेच्या दाबत शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी वाढ होऊन तो १०९४ हेप्टापास्कल पर्यन्त वाढण्याची शक्यता असून जेव्हा तापमानात घसरण होते तेव्हा हवेचे दाब वाढतात. ➡️दक्षिण कोकण - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील तर उत्तर कोकणातील रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अत्यल्प म्हणजे ३मी. मी. पावसाची शक्यता आहे. ➡️उत्तर महाराष्ट्र - नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर धुळे , नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. ➡️मराठवाडा - मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात मोती घटहोणे शक्य असून आकाश निरभ्र राहील पावसाची शक्यता नाही लातूर व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि उर्वरित ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद , लातूर व बीड जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. ➡️पश्चिम विदर्भ - अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात कमाल ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आकाश निरभ्र राहील. ➡️मध्य विदर्भ - यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. ➡️पूर्व विदर्भ - गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नाही. ➡️कृषी सल्ला - हरभरा व बागायत रब्बी ज्वरिची पेरणी करण्यास हवामान अंत्यत अनुकूल बनले आहे. ​ कोकणात भात कंपनी झोडणीसाठी हवामान अनुकूल बनेल. भाताची काढणी व मळणी करावी. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
92
13
इतर लेख