क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताअॅग्रोवन
पहा, या जिल्ह्यात एक लाख ८७ हजार मेट्रिक टन खते मंजूर!
➡️ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आयुक्त कार्यालयाकडून दिलासा मिळाला. सध्या रब्बी हंगामात नत्र खतामध्ये युरियाच्या मागणीची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. ➡️पुणे जिल्हातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हास्तरावर केलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे कृषी आयुक्त कार्यालयाकडे दोन लाख ४३ हजार २८ मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. कृषी आयुक्तालयाकडून एक लाख ८७ हजार ४७० मेट्रिक टन खतासाठी मंजुरी मिळाली आहे. खताचे वाटप सुरू असल्याचे असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. ➡️चालू वर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असली तरी काही पिकांच्या पेरणीचे क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने लवकर तयारी करून पुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. ➡️शेतकऱ्यांना हा पुरवठा तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत केला जाणार आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी दोन लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात यापेक्षा अधिक पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. सुमारे एक लाख ४५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ३७ हजार ४०५ हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३३ हजार ७४८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी बियाण्यांची मागणी केली आहे. ➡️पेरणीच्या वेळेस व पिके वाढीच्या अवस्थेत असताना खताची अडचणी येऊ नये म्हणून बियाण्यांची मागणी केली. वाटप सुरू आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात दोन लाख ६ हजार ५७६ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांच्या मागणीत वाढ केली असली तरी चालू वर्षी खरीप हंगामातील ७९ हजार ५३५ मेट्रीक टन खते शिल्लक आहेत. ➡️तर रब्बीसाठी जवळपास २६ हजार २७ मेट्रीक टन खतांचे वाटप झाले आहे. सध्या रब्बीसाठी एक लाख ५ हजार ५६२ मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत. त्यापैकी पॉश मशिनद्वारे २० हजार २० मेट्रीक टन खतांची विक्री झाली असून ८५ हजार ५४१ मेट्रीक टन खते हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पॉस मशिनवर नोंदणी आवश्‍यक ➡️रब्बी हंगामात नत्र खतामध्ये युरियाच्या मागणीची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी ९६ हजार ४१६ मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना कृषी आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार पॉस मशिनवर नोंदणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना खते मिळणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. संदर्भ -अ‍ॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
49
0
संबंधित लेख