पहा, भेंडी पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाय!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, भेंडी पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाय!
लक्षणे - ही कीड भेंडीच्या पानातून तसेच कोवळ्या भागातून रसशोषण करते. याशिवाय ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा गोड आणि चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी, झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो व झाडाची वाढ खुंटते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने माव्याच्या समूहासह तोडून नष्ट करावीत. नियंत्रण - प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास पिकावर असेटामाप्रिड २०% एसपी @२० ते ४० ग्रॅम किंवा थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @४० ते ८० ग्रॅम प्रति एकर प्रमाणात मिसळून फवारणी करावी. जरुरीप्रमाणे कीटकनाशकाच्या फवारण्या आलटून पालटून १० दिवसांच्या अंतराने कराव्यात. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
5
इतर लेख