AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, बटाटा पिकावरील रोगाचे नियंत्रण कसे करावे?
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, बटाटा पिकावरील रोगाचे नियंत्रण कसे करावे?
1) लवकर येणार करपा - • कोणत्याही अवस्थेत पानांवर पडणारा आणि उबदार तापमान व सततचा पाऊस किंवा वरून होणारे सिचन अथवा दव यामुळे पाने जास्त काळ ओली राहिल्यास चालना मिळणारा बटाट्यातील रोग. • लवकरचा करपा हंगामाचा मध्य ते शेवट या काळात जलदगतीने तयार होऊ शकतो आणि जेव्हा रोपांवर निकृष्ट पोषण, दुष्काळ, इतर रोग , किंवा किडी यामुळे ताण असतो तेव्हा तो जास्त गंभीर होतो. • तीव्रतेत होणारी प्रत्येक १% वाढ उत्पादन १.३६% ने कमी करू शकते आणि जेव्हा रोग जास्त गंभीर असतो तेव्हा पीक संपूर्ण नष्ट होऊ शकते . • उत्पादनात २०-३०% नुकसान होण्याची शक्यता असते. लक्षणे- तपकिरी – काळा उतीमृत ठिपका – कोनीय , लंबगोल त्यावर समकेंद्री वर्तुळे . अनेक ठिपके एकत्र येतात आणि संपूर्ण पानभर पसरतात . फळांवर छिद्रे पाडतात . उपाय - या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सि क्लोराईड ५०% डब्ल्यूपी @१ ते २ किलो प्रति एकर किंवा झायनेब ७५% डब्ल्यूपी @६०० ते ८०० ग्रॅम प्रति एकर किंवा किटाझीन ४८% ईसी @१ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. 2) काळी बुरशी - मध्यम थंड , पावसाळी हवा आणि २३°C तापमान रोगाच्या विकासासाठी पोषक असतात. या रोगामुळे उत्पादनाचे १० -२५% पर्यंत नुकसान होऊ शकते. लक्षणे- • कंदांवर काळे ठिपके , काळ्या ठिपक्यांची खपली, लालसर तपकिरी खपली दिसून येते . • अंकुरणाच्यावेळी डोळ्यांवर गडद तपकिरी रंग येतो. • बाधित कंदामध्ये साल लालसर तपकिरी होते. • अंतर्गत उती तपकिरी होऊन कडक कोरडी कूज दिसून येते. बाधित कंदावर स्पंजाप्रमाणे वाढ दिसते. उपाय - याच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२% + मॅंकोझेब ६३% डब्ल्यूपी @३०० ते ४०० ग्रॅम प्रति एकर फवारणी अथवा आळवणीद्वारे द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
7
इतर लेख