AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, पोस्टाच्या खास 6 योजना!
कृषी वार्ताTV9 Marathi
पहा, पोस्टाच्या खास 6 योजना!
चांगल्या भविष्यासाठी चांगला बँक बॅलन्स असणे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच जर आपण गुंतवणुकीचा विचार करीत असाल तर पोस्ट ऑफिस योजना (Post Office Saving Schemes) आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यातील गॅरंटीसह पैसे दुप्पट होऊ शकतात. तसेच कोणत्याही जोखमीची भीती राहणार नाही. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर लाखो मिळू शकतात. अशा योजनांबद्दलच आपण माहिती घेऊयात. सुकन्या समृद्धी खाते:- ➡️ पोस्ट ऑफिसद्वारे चालविण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना खूप लोकप्रिय आहे. ती मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आली होती. मुलीच्या शिक्षणापासून तिचं लग्न होईपर्यंत यातून आपल्याला मदत मिळते. त्याचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षे आहे, परंतु गुंतवणूक केवळ 14 वर्षांसाठी करावी लागेल. अर्जासाठी मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे. यावेळी पोस्ट ऑफिस योजनेत सर्वाधिक 7.6 टक्के व्याज मिळत आहे. मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 9.47 वर्षे लागतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजना:- ➡️ ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme-SCSS) पोस्ट ऑफिसची SCSS ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगला पर्याय आहे. ही योजना 5 वर्षांसाठी आहे. आपण यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. मॅच्युरिटीनंतर ही योजना 3 वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. खाते उघडण्यासाठी किमान ठेव रक्कम 1000 रुपये असावी. यावेळी या योजनेत 7.4% व्याज दिले जात आहे. सुमारे 9.73 वर्षांत पैसा दुप्पट होईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी:- ➡️ सार्वजनिक भविष्य निधि म्हणजे PPF ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेवर 7.1 टक्के व्याज प्राप्त होत आहे. यामध्ये परतावा पूर्णपणे करमुक्त आहे. त्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे, परंतु आपण 5-5 वर्षांच्या कालावधीत तो वाढवू शकतो. 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.14 वर्षे लागतील. टाईम डिपॉझिट:- ➡️ चक्रवाढ व्याज पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटमध्ये जोडले जाते, म्हणून जास्त परतावा मिळतो. यामध्ये गुंतवणूकदार किमान 1000 रुपयांत खाती उघडू शकतात. जर 1 वर्ष ते 3 वर्षांदरम्यान गुंतवणूक केली असेल तर त्यावर 5.5 टक्के व्याज दिले जात आहे. त्यानुसार 13 वर्षांत आपले पैसे दुप्पट होतील. दुसरीकडे जर तुम्ही 5 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्ही त्यावर 6..7 टक्के व्याज मिळत आहे. तेव्हा सुमारे 10.75 वर्षांत आपले पैसे दुप्पट होतील. मासिक उत्पन्न योजना:- ➡️ मासिक उत्पन्न योजना (POMIS) आपल्या गरजा भागविण्यासाठी उपयुक्त ठरेल. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळू शकते. POMIS वर सध्या 6.6% व्याज मिळत आहे, जर या व्याजदरावर पैशांची गुंतवणूक केली गेली, तर ती सुमारे 10.91 वर्षांमध्ये दुप्पट होईल. रिकरिंग डिपॉझिट:- ➡️ पोस्ट ऑफिसमध्ये नियमित उत्पन्न असणारे लोक दरमहा निश्चित रक्कम जमा करतात, ज्यावर त्यांना व्याज मिळते. आपण आरडीमध्ये दरमहा किमान 100 रुपये जमा करू शकता. आपण 1000 रुपये किंवा त्याहूनही अधिक गुंतवणूक करू शकता. याचा परिपक्वता कालावधी 5 वर्षे आहे. आपण इच्छित असल्यास आपण त्यास आणखी पुढे देखील वाढवू शकता. तुम्हाला सध्या आरडी वर 8.8 टक्के व्याज दिले जात आहे, अशा परिस्थितीत सुमारे 12.41 वर्षांत पैसे दुप्पट होतील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5
इतर लेख