AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, दाणेदार खत आणि विद्राव्य खतातील फरक!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, दाणेदार खत आणि विद्राव्य खतातील फरक!
दाणेदार खते - 👉 दाणेदार खते जमिनीमध्ये दिली जातात. अशी खते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. बांगडी पध्दत, खुरी पध्दत, ओळीतून किंवा फोकूनही दिली जातात. खते दिल्याबरोबर ती जमिनीमध्ये मिसळली खतांची उपयोगिता कमी होते. 👉 दाणेदार खतामधील काही खते पूर्णतः पाण्यात विद्राव्य असतात. (युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश इ.) अशी खते ठिबक संचाव्दारे दिली जातात. 👉 परंतु काही खते अविद्राव्य असतात. अशी खते ठिबक सिंचनाद्वारे देऊ नयेत. शिफारस केलेल्या खत मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात खत देऊ नये. जास्तीची खते देण्यापेक्षा कमी खते देणे केव्हाही सोयीस्कर ठरते. 👉 खते नेहमी कोमट पाण्यामधून दिल्याने खतांची विद्राव्यता वाढते. विद्राव्य खते - 👉 विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात. 👉 सध्या बाजारात प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली अनेक विद्राव्य खते पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विविध ग्रेडसमध्ये उपलब्ध आहेत. 👉 विद्राव्य खते घन तसेच द्रवरुप स्वरुपात उपलब्ध आहेत. घन विद्राव्य खते एक किलो व पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. 👉 ही खते पाण्यात १०० टक्के विरघळतात व आम्लधर्मीय आहेत. 👉 विद्राव्य खते ठिबक संचातून तसेच फवारणीसाठी योग्य असतात. काही विद्राव्य खतामध्ये मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये (मॅग्रेशियम व सल्फर) व सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तांबे) असतात. विद्राव्य खते प्रामुख्याने पीकांवर फवारणीव्दारे दिल्याने जास्त फायदा होती. कारण ती पीकांना लवकर उपलब्ध होतात. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
5
इतर लेख