पशुपालनअॅग्रोवन
पशूसल्ला
पैदाशीच्या वळूचे आहार व्यवस्थापन
• पचनीय प्रथिने १२-१५ टक्के आणि ७० टक्के एकूण पचनीय घटक आहेत असे पशुखाद्य २-३ किलो दर दिवशी द्यावे.
• नवीन वळूला भरपूर प्रमाणात हिरवा चारा द्यावा. कारण त्यांना ‘अ’ जीवनसत्त्वाची गरज असते.
• वळूचा नैसर्गिक रेतनासाठी जास्त वापर असल्यास आहारात पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे.
• नैसर्गिक रेतनासाठी उपयोगात असलेल्या वळूच्या आहारामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस, सेलेनियम, कॉपर या खनिजांचा, ‘अ’ आणि ‘इ’ या जीवनसत्त्वांचा समावेश करावा. या घटकांच्या कमतरतेमुळे वळूची प्रजोत्पादन क्षमता घटू शकते.
• आहारात कॅल्शिअमचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पाठीच्या मणक्याचे हाड आणि इतर हाडे जोडली जातात, त्यामुळे वळूमध्ये नैसर्गिक रेतनावेळी समस्या निर्माण होतात.
• नैसर्गिक रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूच्या आहारात सर्व पोषणतत्त्वांच्या योग्य प्रमाणाबरोबरच पिण्यासाठी योग्यवेळी मुबलक पाणी गरजेचे आहे.
• वळूला गरजेपेक्षा जास्त किंवा कमी चारा देणे टाळावे. योग्य प्रमाणात हिरवा चारा, वाळला चारा आणि पशुखाद्य द्यावे. मुरघासाचाही वापर करावा.
• गरजेपेक्षा जास्त आहार दिल्याने शरीरामध्ये फॅट जमा होऊन वळूंचे वजन वाढते. त्यामुळे पायावर ताण वाढतो. नैसर्गिक रेतनाची इच्छा कमी होते.
• गरजेपेक्षा कमी आहार दिल्यास पोषणतत्त्वांची कमतरता होऊन प्रजोत्पादनक्षमता कमी होते.
• आहार देताना वळूचे वजन व त्याचा नैसर्गिक रेतनासाठी वापर या गोष्टींचा विचार करावा.
• आहारामध्ये शुष्क पदार्थांचे प्रमाण वजनाच्या २ टक्के इतके असावे.
संदर्भ – अग्रोवन ४ फेब्रु १८