AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालकांसाठी 6 कोटी रक्कम जमा!
समाचारAgrostar
पशुपालकांसाठी 6 कोटी रक्कम जमा!
🐄लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाहायला मिळत आहे.सोलापूर जिल्ह्यात ४०८ गावातील सुमारे ३ हजार ७६७ जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये बरीचशी जनावरे उपचार घेऊन बरे देखील झाली आहेत. तर दुर्दैवाने काही बाधित जनावराचा मृत्यू देखील झाला. तसेच त्यासाठी लसीकरण मोहीम देखील राबवण्यात आली. 🐄आजपर्यंत राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे पशू मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. 🐄लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे पाठविण्यात आले. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात येणार आहे. 🐄राज्यामध्ये 29 ऑक्टोबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3176 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1,61,609 बाधित पशुधनापैकी एकूण 1,05,607 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. 🐄संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख