AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुधनाची अशा प्रकारे घ्या काळजी.
पशुपालनHello krushi
पशुधनाची अशा प्रकारे घ्या काळजी.
सध्याचे विदर्भातील कमाल तापमान चाळीस अंशांच्या वर पोहचले आहे. माणसाप्रमाणेच उष्णतेचा त्रास पशुधनास देखील होतो. त्यामुळे अशावेळी पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पशुधनाची अशा प्रकारे घ्या काळजी. - उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता जनावरांना सावलीत बांधावे. - जनावरांना पिण्यासाठी थंड आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. - पशुधनाचा कडून सकाळी 11 ते दुपारी चार या दरम्यान काम करून घेऊ नये. - पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. - पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. - पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठ युक्त खाद्य द्यावे. - तीव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे. - तीव्र उष्णतेच्या काळात पशुधनास पाणवठ्यावर न्यावे. -उष्णतेच्या काळात पशुधनास सकाळी चारावयास सोडावे ➡️संदर्भ:- Hello krushi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
2