AgroStar
पर्सनल लोन घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी!
कृषी वार्ताtv9marathi
पर्सनल लोन घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी!
🛑चांगले पसर्नल लोन कुठे मिळेल? 👉 तुमचे ज्या बँक अकाऊंटमध्ये खाते आहे, त्याच बँकेतून तुम्ही कर्ज घेतले पाहिजे असे गरजेचे नसते. तुम्ही तुम्हाला हव्या त्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. विशेष म्हणजे वैयक्तिक कर्ज हे केवळ बँकेतूनच नाही, तर डिजीटल NBFCs द्वारेही घेता येते. तसेच बऱ्याच एनबीएफसी ‘केवळ इन्स्टॉलमेंट’ या तत्त्वावर कर्ज ऑफर करतात. मात्र कर्ज देण्यापूर्वी तुम्हाला चांगला क्रेडीट स्कोअर असणं महत्त्वाचं आहे. 🛑व्याजदरासह इतर माहितीही आवश्यक 👉 जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेणार असाल, तर ते तुम्ही कोणत्या बँकेतून घेणार आहात हे निश्चित करा. यानंतर कर्ज घेताना तुम्हाला नेमका किती खर्च येतो, याची माहिती असणे गरजेचे आहे. यासोबतच तुम्हाला कर्जासोबत कोणती सुविधा मिळते याचीही माहिती असणे आवश्यक असते. त्या ठराविक बँकेची ग्राहक सेवाही लक्षात घ्या. वैयक्तिक कर्ज घेतेवेळी केवळ व्याज दरच नव्हे तर आगाऊ भरलेली रक्कम शुल्क आणि मुदतपूर्व बंद शुल्काची देखील माहिती असणे गरजेचे आहे. तसेच वैयक्तिक कर्ज घेण्याशी संबंधित सर्व खर्च जाणून घ्या. 🛑कर्ज घेतेवेळी याची काळजी आवश्य घ्या 👉 वैयक्तिक कर्ज घेताना तुम्हाला किती EMI भरावा लागणार आहे ते आवश्यकरित्या पाहा. तसेच ते EMI विनामूल्य परतफेड करण्याचा पर्याय आहे का? तुम्हाला किती दिवसात वैयक्तिक कर्ज मिळू शकते? तुम्ही ज्या संस्थेकडून कर्ज घेत आहात ते कसे आहे? ते सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह आहे की नाही? याचीही थोडी माहिती घ्या. तसेच तुम्ही कर्ज घेणारी बँक तुम्हाला ग्राहक म्हणून चांगली सेवा देते की नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेतेवेळी तुमच्या प्रत्येक शंकाचे निराकरण करणे सोपे होईल. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
4
इतर लेख