AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
परीक्षा न देताही नोकरीची मोठी संधी; असं करा अर्ज!
नोकरीन्यूज १८लोकमत
परीक्षा न देताही नोकरीची मोठी संधी; असं करा अर्ज!
➡️डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चंडीगढ इथे अप्रेन्टिस म्हणून नोकरीची संधी मिळणार आहे. जाहिरात जारी झाल्यापासून २१ दिवसांच्या आत अर्ज सादर करता येणार आहे. ➡️या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी प्रथम राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना (NAPS) apprenticeshipindia.org या पोर्टलवर आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in वर ऑनलाईन सादर करावा लागेल. पात्रता ➡️डिप्लोमा अॅप्रेंटिस - उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांसाठी, उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ➡️पदवीधर प्रशिक्षणार्थी- या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी गणित किंवा सांख्यिकी किंवा भौतिकशास्त्रात बीएससीची पदवी असणं आवश्यक आहे. इतका मिळेल स्टायफंड ITI अप्रेन्टिस - ७,००० रुपये प्रतिमहिना डिप्लोमा अप्रेन्टिस - ८,००० रुपये प्रतिमहिना डिग्री अप्रेन्टिस - ९,००० रुपये प्रतिमहिना अशी होणार निवड उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणांद्वारे गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. संचालक, संरक्षण प्रयोगशाळा, चंदीगड यांनी स्थापन केलेले मंडळ सर्व प्राप्त अर्जांची छाननी करेल आणि पात्रता परीक्षेत त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करेल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
2