कृषी वार्ताअॅग्रोवन
परवानगी नसतानाही, देशात अवैध बीटी वांगी!
नवी दिल्ली: खाद्य पिकांमध्ये जीएम वाणांना देशात परवानगी नाही. मात्र हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या शेतात बीटी वांग्याची लागवड आढळून आली आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेतील तपासणीत या शेतकऱ्याच्या शेतातील वांगी पिकामध्ये कीड नियंत्रणासाठी जनुकीय अभियांत्रिकी प्रक्रियेद्वारा ‘जीवाणू-प्रथिन’ घातले असल्याचे सिद्ध झाले आहे. जीएम-फ्री इंडिया संघटनच्या कार्यकर्त्यांनी ही बाब जनुकीय अभियांत्रिकी संमती समिती (जीईएसी) तसेच हरियाना सरकारच्या निदर्शनास आणून दिली. हरियानातील ही जीएम वांग्याची लागवड अवैध ठरते. पर्यावरण संरक्षण कायद्याचे हे उल्लंघन आहे. हरियाना सरकारने याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन जीएम-फ्री इंडिया संघटनेला दिले आहे.
हरियाना राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बीटी वांग्याचा प्लॉट आहे त्यांनी मध्यस्थांच्या मार्फत रोपं खरेदी केली आहेत. त्यामुळे हरियाना-पंजाब या राज्यात बीटी वांग्याचे बियाणे-रोपे पुरविणारी मोठी यंत्रणा कार्यरत असल्याची शक्यताही जीएम-फ्री इंडियाच्या एका कार्यकर्त्यानी वर्तविली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १३ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
49
0
संबंधित लेख