पपई रिंग स्पॉट वायरस नियंत्रण !
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पपई रिंग स्पॉट वायरस नियंत्रण !
➡️रिंग स्पॉट वायरस रोगाची ओळख - पाने पिवळी फिकट हिरव्या रंगाची होऊन पिवळी पडतात.पानांच्या बाजूस हिरव्या शिरा मुरडतात. रोगाचा प्रादुर्भाव जसजसा वाढतो तसतसा पानांचा आकार लहान होत जातो. झाडांची वाढ होत नाही. ती बुटकी राहतात. पानांचा आकार लहान होऊन अन्नद्रवे तयार होण्याची क्रिया मंदावते कालांतराने ती थांबून जाते.झाडाची पाने वेडीवाकडी वाढतात. पपईच्या फळांवर गर्द हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात.फळांची वाढ होत नाही तर फळांच्या संख्येत घट होते. रिंग स्पॉट वायरस रोगावर उपाययोजना – १. या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे मुळांसोबत उपटून जाळून नष्ट करून टाकावेत. जेणेकरून विषाणूंचा प्रसार होणार नाही. २. मावा कीड या विषाणूचे वाहक समजले जाते. त्यामुळे मावा किडीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी मावा किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी शेतात एकरी २० पिवळे चिकट सापळे लावावेत. ३. पपई फळबागेत कुंपणावर मका , ज्वारीचे पीक लावावेत. ४. पालाशयुक्त खतांचा वापर करावा. जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती वाढेल. ५. नत्र संतुलित प्रमाणात द्यावे जेणेकरून नत्राच्या अतिसारामुळे रोगाची तीव्रता वाढणार नाही. ६. पपई बागेत आंतरपिक म्हणून काकडी वर्गीय पिकांची लागवड करू नये. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
3
इतर लेख