सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई फळांची काढणी व साठवण
• रोपे लागवडीपासून दहा-बारा महिन्यांनी फळे काढणीस तयार होतात. फळ काढणीस तयार झाल्याचे पुढील गुणधर्मावरून ओळखता येते. • फळ काढणीसाठी तयार झाल्यावर त्यावर पिवळे डाग पडतात. त्यास कवडी पडणे असे म्हणतात. • फळातून निघणारा चीक जेव्हा पाण्यासारखा पातळ निघतो तेव्हा फळ काढणीसाठी तयार झाले असे समजावे. • फळांच्या देठाजवळचा भाग पिवळा दिसू लागतो. • फळांची तोडणी करताना फळे देठासहीत तोडावीत. स्थानिक बाजारासाठी पूर्ण तयार झालेली फळे काढावीत. • काढणीनंतर त्यांच्या आकाराप्रमाणे प्रतवारी करावी.
• फळे स्वच्छ करून प्रत्येक फळावर कागद गुंडाळून टोपल्यात खालीवर गवताचा पेंडा भरून पॅकिंग करावे. टोपलीचे झाकण लावून टोपल्या सुतळीने शिवाव्यात व विक्रीसाठी पाठवाव्यात. टोपल्यात आकारमानाप्रमाणे ४ ते १० फळे बसतात. • फळे लागण्याचे प्रमाण पहिली तीन वर्षे भरपूर असते. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या उत्पादन परवडत नाही म्हणून झाडे काढून टाकावीत. • फळांची साठवण – फळांची साठवण करण्यासाठी २० अंश सेल्सिअस तापमान सर्वोत्तम असते. फळे पिकण्याची क्रियासुद्धा या तापमानात चांगली होते. यापेक्षा जास्त तापमानामध्ये फळांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. संदर्भ - अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
1614
15
इतर लेख