अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई पिकातील रिंग स्पॉट व्हायरस समस्या आणि उपाय!
पपई पिकात रिंग स्पॉट व्हायरस या रोगामुळे झाडाची शेंड्याची पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात व आखडली जातात. झाडाच्या खोडावर आणि फळावर गर्द हिरव्या रंगाचे चट्टे दिसून येतात व फळांचा आकार लहान होतो. हा विषाणूजन्य रोग मावा या किडीपासून पसरवला जातो. यावर प्रतिबंध म्हणून पपई पिकाची लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करावी. तसेच पपई बागेच्या कडेला चारही बाजूंना मका पीक करावे जेणेकरून मावा कीड मका पिकाकडे आकर्षित केली जाईल. फवारणी साठी निमार्क @ २ -३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
49
20
संबंधित लेख