AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपई पिकातील मोझॅक व्हायरस समस्येचे व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई पिकातील मोझॅक व्हायरस समस्येचे व्यवस्थापन!
पपई हे फळपीक उष्णकटीबंधीय क्षेत्रांमध्ये घेतले जाते. केळी पिकानंतर प्रति एकर सर्वाधिक उत्पादन देणारे आणि औषधी गुणवत्तापूर्ण असणारे हे पीक आहे. रिंग स्पॉट रोग (Ring spot disease): ➡️ पपई पिकामध्ये हा रोग कोणत्याही अवस्थेमध्ये उद्भवू शकतो. या रोगाची लक्षणे वरील कोवळ्या पानांवर दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त पानांच्या शिरा पिवळ्या पडून आकार लहान दिसतो. पानांचा वरील भाग खडबडीत होऊन, त्यावर हिरव्या रंगाचे ठिपके पडतात तसेच झुपकेदार लहान झाड होऊन पाने आकाशाच्या दिशेने उभी राहतात. झाडामध्ये नवीन पानांवर पिवळा मोझॅक आणि गडद हिरवा भाग तयार होतो. रोगाचे कारण: ➡️ हा रोग विषाणूंमुळे प्रसारित होतो. ज्याला पपई पिकावरील रिंग स्पॉट रोग (Ring spot virus) म्हटले जाते. हा रोग पपई पिकातून इतर पिकांमध्ये प्रसारित होण्याची शक्यता असते. हा रोग ‘मावा’ या रोगवाहक किडीमार्फत प्रसारित होतो. मोझॅक (Mosaic): ➡️ या रोगाची लक्षणे नवीन पानावर दिसतात. ही एक पानांवरील विकृती असून, याची लक्षणे रिंग स्पॉट रोगासारखीच दिसतात. या रोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडीमुळे होतो. रोगाचे नियंत्रण: पुढील उपायांचे अनुसरण करून, रोगाची तीव्रता कमी केली जाऊ शकते. ● रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करून बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ● नवीन बाग लागवड करतेवेळी, निरोगी आणि रोगविरहित रोपांची निवड करावी. ● रोगग्रस्त झाडे कोणत्याही उपायाने निरोगी होऊ शकत नाहीत त्यामुळे रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा, या विषाणूचा कायमचा स्रोत झाडांवर टिकून राहतो, यामुळे एकाच वेळी इतर झाडांवर या रोगाचा प्रसार होत राहतो. ● रोगवाहक किडींच्या (मावा) नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% एसएल ०.३ मिली प्रति लीटर पाण्याच्या प्रमाणाने १० ते १२ दिवसांच्या अंतराने पिकावर फवारणी करणे गरजेचे आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
4