AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपई पिकातील महत्वाचे पाणी व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पपई पिकातील महत्वाचे पाणी व्यवस्थापन!
➡️ पपई पिकाच्या झाडाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे अन्यथा पिकास पाणी कमी पडल्यास झाडाची वाढ न होणे, फुलगळ होणे तसेच फळांचा विकास न होणे या समस्या मोठ्या प्रमाणात येतात. ➡️ याउलट पिकास अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यास जमिनीतील जास्त ओलाव्यामुळे पपई पिकाचे खोड पोकळ असल्याने खोडकूज व मूळकूज ह्या समस्या आढळून येतात. ➡️ यामुळे पिकास ठिबक नसल्यास जमिनीच्या प्रकारानुसार 5 ते 6 दिवसांच्या अंतराप्रमाणे द्यावे. ठिबक असल्यास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
4