AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपई पिकातील महत्वाचे पाणी व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई पिकातील महत्वाचे पाणी व्यवस्थापन!
पपई पिकाच्या झाडाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे अन्यथा पिकास पाणी कमी पडल्यास झाडाची वाढ न होणे, फुलगळ होणे तसेच फळांचा विकास न होणे या समस्या मोठ्या प्रमाणात येतात. याउलट पिकास अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यास जमिनीतील जास्त ओलाव्यामुळे पपई पिकाचे खोड पोकळ असल्याने खोडकूज व मूळकूज ह्या समस्या आढळून येतात. यामुळे पिकास ठिबक नसल्यास जमिनीच्या प्रकारानुसार ५ ते ६ दिवसांच्या अंतराने १४ ते १५ लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे द्यावे. ठिबक असल्यास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1