AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपईमधील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक व्यवस्थापन
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपईमधील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक व्यवस्थापन
पपईमधील पिठ्या ढेकणाचा प्रसार हा प्रथम २००८ मध्ये तमिळनाडू येथील कोईमतूर येथे झाला. केरळ कर्नाटक,त्रिपुरा आणि महाराष्ट्रमध्ये त्यांचा हळूहळू प्रसार वाढत गेला. हे पान खोड,किंवा फळामधील रस शोषून घेतात. त्याचबरोबर त्यांचा जास्त प्रादुर्भाव असेल तर पपईची पानेदेखील गळतात. पपई खाण्यालायक राहत नाही. यामुळे या फळाचे अंदाजे ६०-७० टक्के नुकसान होते.
एकात्मिक व्यवस्थापन : • वेळच्या वेळी बागेचे सर्वेक्षण करावे. • प्रादुर्भाव झालेली पाने व फळे जमा करून नष्ट करून टाकावीत. • बागेमध्ये नेहमी साफसफाई व स्वच्छता ठेवावी. • मातीची मशागत केल्यावर काही काळ उन्हामध्ये तापू द्यावी. • वेळोवेळी खुरपणी करावी व तणांचा नायनाट करावा. • पिठ्या ढेकुनच्या एकात्मिक नियंत्रणासाठी परभक्षी कीटकांचा वापर करावा. • शिफारस केलेल्या कीटकनाशकचा योग्य वापर करावा. • अॅसरफॅगस पपया किंवा अॅनाग्रीस लोएकी यासारख्या कीटक उपलब्ध असतील तर परावलंबी कीटकांचा वापर करावा. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
590
4