फळ प्रक्रियाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपईपासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ
पपई फळ पिकापासून वर्षभर फळे मिळतात. परंतु दूरच्या मार्केटमध्ये माल पाठविताना फार दिवस टिकत नाही. त्यासाठी पपईवर प्रक्रिया करणे जरूरीचे आहे. आपण पपई टूटी फ्रुटी प्रक्रियेसंदर्भात जाणून घेऊया.
टूटी फ्रूटी बनविण्याची पद्धत:-_x000D_ १. टूटीफ्रुटी बनवण्यासाठी पूर्ण तयार झालेली पण कच्ची फळे निवडावीत. _x000D_ २. फळे स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घ्यावीत. _x000D_ ३. पपईच्या उभ्या कापा करून त्यावरील हिरवी साल तसेच बिया व त्याखालील पातळ पापुद्रा काढून घ्यावा. _x000D_ ४. नंतर सुरीच्या सहाय्याने चौकोनी लहान-लहान तुकडे करून घ्यावे. त्यासाठी फ्रेंच फ्राय कटरचा वापर केला तरी उत्तम. _x000D_ ५. हे तुकडे उकळत्या पाण्यात १५ ते २० मिनिट उकळून घ्यावे. नंतर पाण्यातून बाहेर काढून चाळणीत निथळत ठेवावे. _x000D_ ६. ४० टक्के साखरेच्या पाकात हे तुकडे १५ ते ३० मिनिटे किंवा जोपर्यत तुकडे पारदर्शक दिसत नाही तोपर्यत शिजवून घ्यावेत._x000D_ ७. दुसऱ्या दिवशी पाकातून बाहेर काढून पाकात साखर टाकून, थोडा वेळ उकळून पाक ६० टक्के तीव्रतेचा करून थंड करून घेणे. व पुन्हा पपईचे तुकडे त्यात मुरण्यासाठी ठेवणे._x000D_ ८. तिसऱ्या दिवशी पुन्हा तुकडे पाकातून बाहेर काढून पाकात साखर टाकून, थोडा वेळ उकळून पाक ७० टक्के तीव्रतेचा करून थंड करून घेणे. त्यात पपईचे तुकडे मुरण्यासाठी ठेवणे. ह्याच दिवशी पाकात आपल्या आवडीप्रमाणे खायचा रंग तसेच इसेन्स टाकून घ्यावा. _x000D_ ९. चवथ्या दिवशी तुकडे पाकातून बाहेर काढावेत व जास्तीचा पाक चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यावा. एकदा पाण्यातून धुवून हे तुकडे एकसारखे ट्रेमध्ये पसरून उन्हात २ ते ३ ते दिवस वाळवावे. ट्रे ड्रायरमध्ये ५५ अंश से. तापमानास ठेवेऊन २४ ते ४८ तास वाळवून घ्यावे._x000D_ १०. तयार टूटीफ्रुटी प्लास्टिकच्या पिशवीत सीलबंद करून थंड व कोरड्या जागी ठेवावीत. _x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
147
0
इतर लेख