गुरु ज्ञानAgrostar
पनामा विल्ट केळी फळबागेसाठी घातक!
🌱पनामा विल्ट (मर रोग ) या रोगाची सुरूवात लागवडी नंतर चार ते पाच महिन्याने होते. झाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट हिरवे ते फिकट पिवळया रंगाच्या रेषा दिसतात. पानांच्या कडा पिवळ्या पडत-पडत संपूर्ण पान पिवळे होते. खालून वर या क्रमाने झाडावरील सर्व पाने १ -३ आठवडयात पिवळट होतात. जुन्या पानांच्या कडा वाळतात पाने देठाकडील बाजूने हळू–हळू जमिनीच्या दिशेने वाकतात. पाने संपुर्ण वाळतात व गळून पडतात.
🌱रोगाचा प्रसार :- या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगट कंद, संसर्गित माती, बागेतील रोगट झाडांचे अवषेश, रोगट बागेत वापरलेली अवजारे, वाहने, चरणाऱ्या गुरांचे खुर, रोगग्रस्त बागेतून वाहणारे पाणी, बागेत वाढणारी दगडी तसेच दुधाणी ही तणे, सुत्रकृमी तसेच केळीवरील कंद पोखरणारे सोंडे व खोड पोखरणारी अळी या रोगाचे वाहक असतात.
🌱नियंत्रणाचे उपाय :
• हंगाम संपताना बागेतील सर्व झाडांचे अवषेश गोळा करून पुर्णपणे नष्ट करून बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.
• लागवडीपुर्वी शेतात प्रति झाडास १० किलो याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत व त्यासोबत ट्रायकोडर्मा हे जैविक नियंत्रक १०० ग्रॅम प्रति झाड वापरावे.
• लागवडीसाठी प्रादुर्भावग्रस्त बागेतील कंद, मनुवे वापरू नयेत.
• लागवडीनंतर ५,६ व ९ महिन्यांनी २ टक्के कार्बेन्डेझिमची बुंध्याजवळ आळवणी करावी.
• केळी बागेस ठिबक सिंचनाव्दारेच योग्य प्रमाणात पाणी द्यावे.
• बागेतील मर रोगग्रस्त झाडे निवडून त्यांची दुर अंतरावर विल्हेवाट लावावी.
• सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी निमबेसेडिन ०.०३ टक्के प्रवाही १५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात ३० मिनीटे कंद प्रक्रिया करावी.
🌱संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.