AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे ही सरकारी योजना!
समाचारन्यूज १८ लोकमत
पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे ही सरकारी योजना!
रिटायरमेंट सिक्योर करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी सरकारची अटल पेन्शन योजना चांगला पर्याय आहे. या योजनेत पती आणि पत्नी वेगवेगळं अकाउंट ओपन करुन दरमहिना १०००० रुपये पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत १८ ते ४० वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत ६० वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. अटल पेन्शन योजना ही सरकारी योजना आहे, ज्यात तुमच्याद्वारे गुंतवणूक केली जाणारी रक्कम तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये आणि अधिकतर 5,००० रुपये मासिक पेन्शन मिळतं. ही एक सुरक्षित गुंतवणूक असून यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेव्हिंग अकाउंट, आधार नंबर आणि एक मोबाईल नंबर असणं गरजेचं असतं. काय आहेत योजनेचे फायदे - या योजनेअंतर्गत १८ ते ४० वयोगटातील लोक अटल पेन्शन योजनेत आपलं नॉमिनेशन करू शकतात. त्यासाठी अर्जदाराकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीने १८ व्या वर्षी अटल पेन्शन योजना सुरू केल्यास, त्याला ६० वर्षानंतर दर महिन्याला ५००० रुपये मासिक पेन्शन मिळेल. यासाठी दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. केवळ ६० रुपयांत सुरू करा LIC ची ही पॉलिसी, मॅच्युरिटीवर मिळेल संपूर्ण प्रीमियम ३९ वर्षाहून कमी वयोगटातील पती-पत्नी या योजनेचा वेगवेगळा लाभही घेऊ शकतात. यात त्यांना ६० वर्षानंतर संयुक्तरित्या दर महिन्याला १० हजार रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नीचं वय ३० वर्ष किंवा त्याहून कमी आहे, त्यांना आपापल्या अकाउंटमध्ये दर महिन्याला ५७७ रुपये भरावे लागतील. जर पती-पत्नीचं वय 35 वर्ष असेल, तर त्यांना दर महिन्याला ९०२ रुपये आपल्या APY अकाउंटमध्ये टाकावे लागतील. जर पती-पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाला, तर जीवित पार्टनरला 8.5 लाख रुपये मिळतील. तसंच दर महिन्याला संपूर्ण पेन्शनही मिळेल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
115
27