योजना व अनुदानAgroStar
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना!
👉🏻भारतातील लाखो असंघटित कामगारांसाठी ही योजना विशेषतः सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगार अर्ज करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम अर्जकर्त्याच्या वयानुसार निश्चित केली जाते, जी 55 ते 200 रुपयांपर्यंत असते.
👉🏻2 रुपयांपेक्षा कमी बचत करून मिळवा 36 हजार पेन्शन:
जर तुम्ही 18 व्या वर्षी पीएम श्रम योगी मानधन योजना साठी अर्ज केला, तर तुम्हाला दररोज फक्त 2 रुपयांपेक्षा कमी बचत करावी लागेल. या गुंतवणुकीत तुम्हाला दरमहा फक्त 55 रुपये भरावे लागतील. वयाच्या 60 वर्षांपर्यंत ही गुंतवणूक सुरू ठेवल्यास, तुम्हाला दरमहा 3,000 रुपये म्हणजेच वर्षाला 36,000 रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.
👉🏻कोणत्या कामगारांसाठी आहे ही योजना?
रस्त्यावरील विक्रेते, चालक, प्लंबर, शिंपी, मध्यान्ह भोजन कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरा वेचणारे, विडी उत्पादक, हातमाग, शेती, इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लागू आहे. या योजनेमुळे कामगारांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल.
👉🏻त्यामुळे, आता कमी बचत करूनही वृद्धापकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. ही योजना देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा देणारी आहे.अधिक माहिती साठी https://maandhan.in/ ला भेट द्या.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.