क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताNDTV इंडिया
पंतप्रधान मोदींकडून 'लॉकडाऊन 4' ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार.
• सुधारणा राबवणं हे महत्वाचं, सुधारणा राबवल्यामुळेच संकटात टिकलोय, कुणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हेही त्यावेळेस झालंय ज्यावेळेस सगळं बंद होतं, सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील, कृषी विभागात सुधारणा राबवल्या जातील, टॅक्समध्ये सुधारणा होतील _x000D_ • कुटीर, गृह, लघू उद्योगासाठी पॅकेज, शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं पॅकेज, मध्यमवर्गीयांसाठीही हे पॅकेज महत्वाचं, भारतीय उद्योग जगतासाठीही हे पॅकेज, उद्यापासून ह्या पॅकेजची सविस्तर माहिती, केंद्रीय अर्थमंत्री माहिती देतील._x000D_ • २०२० मधले २० लाख कोटींचे पॅकेज आत्मनिर्भर भारतास गती देईल _x000D_ • आत्मनिर्भर भारत अभियानासाठी पॅकेज विशेष आर्थिक पॅकेज, २० लाख कोटींचे पॅकेज, हे पॅकेज भारताच्या GDP च्या १०% असेल, पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करेल _x000D_ • पाच स्तंभांवर आत्मनिर्भरतेची इमारत उभी, आत्मनिर्भरतेचा पहिला स्तंभ अर्थव्यवस्था, दुसरा स्तंभ पायाभूत सुविधा, तिसरा स्तंभ तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था, चौथा स्तंभ आपली भौगोलिकता, पाचवा स्तंभ मागणी-पुरवठ्याचे चक्र _x000D_ • भारताची औषधांनी जगात नवी आशा निर्माण केली, जगभर भारताची प्रशंसा होत आहे, जगाला वाटतंय की भारत खूप चांगलं करु शकतो _x000D_ • भारत आत्मनिर्भर म्हणताना आत्मकेंद्रीततेनं पाहात नाही, ‘जय जगत’ वर भारताचा विश्वास_x000D_ • भारताकडे जग आशेने पाहतंय, वसुधैव कुटुंबकम हा भारताचा आत्मा आहे._x000D_ • अर्थकेंद्रीत वैश्विकरण विरुद्ध मानवकेंद्रीत वैश्विकरणाची चर्चा जोरात आहे _x000D_ • यापूर्वी भारतात पीपीई किट किंवा N९५ मास्क बनत नव्हते, मात्र आता २-२ लाखांचं उत्पादन होत आहे, हे संकटामुळे शक्य झालं, स्वावलंबी होऊ शकलो._x000D_ • स्वावलंबी भारत हेच ध्येय, हाच मार्ग आहे, इतकी मोठी आपत्ती भारतासाठी एक संधी घेऊन आली आहे,२१ वं शतक हे भारताचं आहे हे आपण ऐकत आलो आहे, कोरोना संकटकाळातही जगभरात जी परिस्थिती आहे ते अभूतपूर्व आहे, मात्र २१ वं शतक हे भारताचं असावं हे केवळ स्वप्न नको तर जबाबदारीही हवी._x000D_ • कोरोना आपल्या आयुष्याचा भाग होणार, मास्क घालू, अंतर ठेऊ, आपलं लक्ष्य विसरणार नाही, लॉकडाऊन ४ नव्या नियमांसह असेल, लॉकडाऊन ४ ची माहिती १८ मे पूर्वी दिली जाणार._x000D_ संदर्भ - १२ मे २०२० कृषी जागरण, _x000D_ यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_
524
0
संबंधित लेख