AgroStar
सभी फसलें
कृषि ज्ञान
कृषि चर्चा
अॅग्री दुकान
पंतप्रधान देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना करणार सुरू
कृषि वार्ताAgrostar
पंतप्रधान देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना करणार सुरू
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रकूट येथे देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना सुरू करणार असल्याचे सांगितले. देशात सुमारे 86 टक्के शेतकरी छोटे आणि अल्पभूधारक असून त्यांच्याकडे 1.1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. छोटे, मध्य आणि भूमीहीन शेतकऱ्यांना कृषी उत्पादन टप्प्यात तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांची उपलब्धता यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो._x000D_ आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनांचे विपणन करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. शेतकरी उत्पादक संघटना अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्यांना सामूहिक बळ देतात. या संघटनांचे सदस्य तंत्रज्ञान, वित्त पुरवठा आणि बाजारपेठेत शेतमाल घेऊन जाण्यासाठी मदत करतात, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वेगाने वाढ होईल._x000D_ संदर्भ – Agrostar, 29 फेब्रुवारी 2020_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
35
0
अन्य लेख