AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा!
समाचारTV9 Marathi
पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा!
➡️ पंतप्रधान ठिबक सिंचन योजनामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले असून आता २०२५-२६ पर्यंत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. म्हणजेच यामध्ये २ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळता यावा व योग्य वापर करुन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली होती. ➡️ शिवाय केंद्र सरकारने या योजनेकरिता ५० हजार कोटींची तरतूदही केली आहे. सिंचनासाठी जर स्प्रिंकलरचा वापर केला तर ८० ते ९० टक्के अनुदान सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय स्प्रिंकलरमुळे शेतजमिनीचे नुकसान तर होणार नाहीच शिवाय कमी उंचीच्या पिकांसाठी हे प्रभावी आहे. आता सरकारने काय निर्णय घेतला आहे ➡️ पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान कृषी सिंचन योजने वाढीव मुदत देण्यात आली आहे. आता ही योजना २०२५-२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा कोण लाभ घेऊ शकते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमिन असणे आवश्यक आहे. शेतकरी वैयक्तिक तर लाभ घेऊ शकतोच शिवाय शेती गट, संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, शेती उत्पादक कंपन्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांचे सदस्य यांनाही लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2021 चा हा अशा शेतकऱ्यांनाही होणार आहे जे गेल्या सात वर्षांपासून भाडेपट्टी करारांतर्गत शेतजमिन करीत आहेत. कंत्राटी पध्दतीने शेती करणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
58
12
इतर लेख