AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी ४००० कोटींचा निधी व नाबार्डकडून ५००० कोटींचा निधीस मंजुरी! _x000D_
कृषी वार्ताAgrostar
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी ४००० कोटींचा निधी व नाबार्डकडून ५००० कोटींचा निधीस मंजुरी! _x000D_
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठीच्या अंतिम ४००० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने दिली आहे.'प्रति थेंब अधिक पीक' अंतर्गत विविध राज्यसरकारांना या निधीचे वितरण करण्यात येत आहे. कृषी मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.विद्यमान (२०२०-२१) आर्थिक वर्षातील अंतिम ४००० कोटींच्या निधीस मान्यता देऊन या संदर्भात प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, संबंधित राज्य सरकारांना माहिती देण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट ले. प्रति थेंब अधिक पीक या मोहिमेंअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्रालय पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी करीत आहे.या अंतर्गत शेती सिंचनासाठी सूक्ष्म सिंचनातील ठिबक,तुषार सिंचन व्यवस्थांद्वारे पाण्याचा काटेकोर वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाद्वारे केवळ पाणीबचतच होत नसून,खतांचा कमी वापर,मजुरी आणि इतर निविष्ठांवरील खर्च कमी होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक(नाबार्ड) माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी देशभरातील ४६.९६ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. संदर्भ - Agrostar १० जुन २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
510
0
इतर लेख