AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पंजाब नॅशनल बँकेत 46 जागांसाठी मोठी पदभरती!
नोकरी न्यूज १८ लोकमत
पंजाब नॅशनल बँकेत 46 जागांसाठी मोठी पदभरती!
➡️पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र इथे लवकरच दहावी आणि बारावी उत्तीर्णांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२२ असणार आहे. शिपाई - ▶️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ▶️तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ▶️उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. ▶️उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाई कामगार - ▶️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ▶️तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ▶️उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. ▶️उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे या जिल्ह्यांमध्ये मिळणार नोकरी ▶️कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये आणि गोवा राज्यातही यासाठी पोस्टिंग दिल्या जाणार आहेत. ही कागदपत्रं आवश्यक 1)Resume (बायोडेटा) 2)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं 3)शाळा सोडल्याचा दाखला 4)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 6)पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता ▶️सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,११८२/१७, तळ मजला, ४थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-४१६००८ किंवा संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
4
इतर लेख