कृषी वार्ताTV9 Marathi
पंजाब नॅशनल बँकेचा पुढाकार;सुरु केली शेतकऱ्यांसाठी खास योजना!
➡️ अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे दुष्काळ, महापूर आणि चक्रीवादळ अशा नैसर्गिक संकटांना वारंवार सामोरे जावे लागेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांना कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु, बँकेच्या निकषांमुळे अनेक शेतकरी कर्जासाठी पात्र ठरत नाहीत. अशावेळी या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने आता शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. ➡️ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. फार्महाऊस, फळबागेची खरेदी, शेतीच्या कामांसाठी लागणारी वाहने आणि डेअरीच्या विकासासाठी पीएनबी बँक कर्ज देईल. किती कर्ज मिळणार? ➡️ या योजनेच्या माध्यमातून पीएनबी बँक लहान शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देईल. लहान शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. हे कर्ज फेडण्यासाठी पाच ते सात वर्षांचा अवधी दिला जाईल. कर्जासाठी कशाप्रकारे अर्ज कराल? * पीएनबी बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन लोनचा पर्याय निवडावा. * त्यानंतर Agriculture loan new application वर क्लिक करा. * फॉर्ममध्ये सर्व तपशील भरा. * यानंतर फॉर्म सबमिट करावा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
156
22
इतर लेख